4
Mumbai, Maharashtra, India
time : Aug 9, 2025 11:47 AM
duration : 0h 38m 21s
distance : 2 mi
total_ascent : 288 ft
highest_point : 361 ft
avg_speed : 3.2 mi/h
user_id : deepakmalap1997
user_firstname : Deepak Malap
user_lastname : Malap
बांद्रा किल्ला"
माहीमच्या खाडीमुळे, मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे इतिहासात ह्या भागाला खुप महत्व होते. या भागाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी १६४० साली साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर "बांद्रयाचा किल्ला" बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला. बांद्रा किल्ल्याची पुरातत्व विभागाने डागडूजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सुंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक पोर्तुगिज शिलालेख कोरलेला आहे. तो पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर, डाव्या हातास दुसरे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्यात 'बांद्रा लँड एण्ड गार्डन' या सोसायटीने बाग तयार केलेली आहे. किल्ल्यात इतर काही अवशेष उरलेले नाहीत.
@"सह्याद्री प्रेमी भटक्या"
दुर्ग भेट : ०९ ऑगस्ट २०२५