Mangaon Taluka, Maharashtra, India
time : Feb 16, 2025 7:21 AM
duration : 11h 34m 48s
distance : 26.5 km
total_ascent : 865 m
highest_point : 808 m
avg_speed : 3.0 km/h
user_id : neenadsw
user_firstname : Neenad
user_lastname : w
चाच- निसणीची वाट ( कातळात कोरलेल्या पायऱ्या)- केळगण गाव-नंतर डांबरी रस्त्याने मोरेवाडी- कामतवाडी पर्यंत जायचे.
नंतर रस्ता सोडून उजवीकडे कच्चा रस्ता घ्यायचा. वाट अजीबात सोडायची नाही. मध्ये एक वाट डावीकडे वर जाते ती घ्यायची नाही कारण ती कुंभे ला जाते.
नंतर बदडेमाची- बोरमाच ही छोटी गाव लागतात. बारमाच वरुन एक एका डोंगराचा उंच टोक दिसते . त्याच्या डाव्या घळी ला तेल्याची नाळ म्हणतात तीने वर घाटात यायचे.
नंतर घोळ गाव रस्ता- कुंभे वाडी पर्यतं जंगलातून रस्ता आहे. लगेचच डांबरी रस्ता सोडून एक कच्चा रस्ता खाली उतरतो तो एका मोठ्या विहीर पर्यंत जातो. विहीरी वरुन डावीकडे एक पायवाट जाते. एक ओढा पार करून आपण परत डांबरी रस्त्यावर येतो. ह्या डांबरी रस्त्यावर एक देवीचे म्ंदीर आहे. मंदिरा समोर डांबरी रस्तासोडून उजवीकडे एक वाट खाली जंगलात उतरते ( बाजार नाळ). परत थोडा डांबरी रस्ता मांर्जुणे गावा पर्यंत घ्या. एका वळणावर डावीकडे एक वाट खाली मानगड दरवाज्याच्या खाली असलेल्या देवळाजवळ उतरते - हीच शिबंदीची वाट .
ईथुन मानगड आणि उजवीकडील डोंगराच्या मध्ल्या वाटेने जंगलातून मार्ग काढत चाच गाव गाठायचे.